एकदा हास तु............ ......... .
एकदा हास तु, एकदा हास तु,
हसत माझा मला परत दे श्वास तु || ध्रु ||
ऐक आतातरी पुस ही आसवे
बोल माझ्या सवे बैस माझ्यासवे
का तुझा जाळिशी व्यर्थ मधुमास तु
हसत माझा मला परत दे श्वास तु || १ ||
वेदनेला कुणी हाक मारु नये,
भेटलेल्या सुखा दुर सारु नये,
विसर ही काळजी विसरुनी आभास तु,
हसत माझा मला परत दे श्वास तु || २ ||
एकटे मी तुला आठवावे किती,
गीत वेडे तुझे गुणगुणावे किती,
दे जरासा तुझा मधुर सहवास तु,
हसत माझा मला परत दे श्वास तु || ३ ||
- सुरेश भट
Wednesday, February 17, 2010
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
तुला लागतो चहा , मला लागते कॉफ़ी
तुला नाही आवडत मी ऊलटी घातलेली टोपी
तुला वाजते थंडी , मला होतं गरम
तू आहेस लाजाळू , मी अगदीच बेशरम
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे
आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे
मी मात्र झोपतो बाराच्या नंतर
रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
फ़िरायला आवडतं , आवडतं तुला शॉपिंग
कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग
मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा
कळत नाही रंग राखाडी आहे की काळा
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
घालतो मी शर्ट इस्त्री न करता
जाऊन येतो एकटाच इतरांच न ठरता
तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट
बाहेर निघताना नखरे सतराशे साठ
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा
जातो बाजाराला पण काम विसरतो सारखा
तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रिण
बारीक तुझी नजर , डोळे आहेत की दुर्बीण?
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
एक सांगू का तुला ?
हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं
तुझं आणि माझं जमेल का तसं?
तुला लागतो चहा , मला लागते कॉफ़ी
तुला नाही आवडत मी ऊलटी घातलेली टोपी
तुला वाजते थंडी , मला होतं गरम
तू आहेस लाजाळू , मी अगदीच बेशरम
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे
आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे
मी मात्र झोपतो बाराच्या नंतर
रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
फ़िरायला आवडतं , आवडतं तुला शॉपिंग
कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग
मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा
कळत नाही रंग राखाडी आहे की काळा
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
घालतो मी शर्ट इस्त्री न करता
जाऊन येतो एकटाच इतरांच न ठरता
तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट
बाहेर निघताना नखरे सतराशे साठ
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा
जातो बाजाराला पण काम विसरतो सारखा
तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रिण
बारीक तुझी नजर , डोळे आहेत की दुर्बीण?
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
एक सांगू का तुला ?
हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं
तुझं आणि माझं जमेल का तसं?
जन्मोजन्मीचा बंध आपसूक कळतो
शंभर माणसं असतात आसपास
का एकच चेहरा आपलासा वाटतो ?
का तो दिसता,चेहरा आपला खुलतो ?
संगतीला कुण्णीही चालतं
का एकाजवळंच मोकळं होतो ?
का भरुन येता त्याच्याच कुशीत शिरतो ?
अनेक दुखापती पाहतो सहज
का एकाच्याच दुखण्याने जीव कळवळतो ?
का त्याच्यावरचे वार स्वत:वर झेलतो ?
सरळ शब्दं हमखास कोडं घालतात
का एकाचंच मौनही धडाधड वाचतो ?
का त्याच्या एका शब्दासाठी श्वास अडकतो ?
आठवणींचे वादळ वेडावत येते
का एकाच्याच आठवणीत मनसोक्त भिजतो ?
का भर उन्हात त्याच्यावर छाया धरतो ?
जुने नवे स्पर्श तर होतात वरवर
का एकाचाच सहवास मनाला गुदगुल्या करतो ?
का त्याच्या मिठीसाठी आजन्म आसुसतो ?
कळायला वेळ थोडा जरुर जातो
पण , जेव्हा तर्क वितर्कांच्या पल्याड पोहचतो
जन्मोजन्मीचा बंध आपसूक कळतो..
जन्मोजन्मीचा बंध आपसूक कळतो
का एकच चेहरा आपलासा वाटतो ?
का तो दिसता,चेहरा आपला खुलतो ?
संगतीला कुण्णीही चालतं
का एकाजवळंच मोकळं होतो ?
का भरुन येता त्याच्याच कुशीत शिरतो ?
अनेक दुखापती पाहतो सहज
का एकाच्याच दुखण्याने जीव कळवळतो ?
का त्याच्यावरचे वार स्वत:वर झेलतो ?
सरळ शब्दं हमखास कोडं घालतात
का एकाचंच मौनही धडाधड वाचतो ?
का त्याच्या एका शब्दासाठी श्वास अडकतो ?
आठवणींचे वादळ वेडावत येते
का एकाच्याच आठवणीत मनसोक्त भिजतो ?
का भर उन्हात त्याच्यावर छाया धरतो ?
जुने नवे स्पर्श तर होतात वरवर
का एकाचाच सहवास मनाला गुदगुल्या करतो ?
का त्याच्या मिठीसाठी आजन्म आसुसतो ?
कळायला वेळ थोडा जरुर जातो
पण , जेव्हा तर्क वितर्कांच्या पल्याड पोहचतो
जन्मोजन्मीचा बंध आपसूक कळतो..
जन्मोजन्मीचा बंध आपसूक कळतो
जराशी उशिरा मला मौत यावी
असा जीवनाचा लळा लागला रे ...
झरा वेदनेचा सखा वाटला रे !!!
मुका वाटतो मी परी मुक नाही
व्यथा सांगणारा गळा दाटला रे !!!
तिला साजणाची कधी याद यावी
तिचा एकटिचा असे मामला रे !!!
कधी सावली का तुझ्या दूर गेली ??
पळुनी असा तू कुठे चालला रे !!!
किती मी तुझी चाकरी रोज केली
प्रभू तू तरिही कुठे पावला रे !!!
जिच्या मी रुपेरी रूपाचा दिवाणा
तिनेही लटांनी गळा कापला रे !!!
जराशी उशिरा मला मौत यावी
तिने कुंकवाचा टिळा लावला रे !!!
झरा वेदनेचा सखा वाटला रे !!!
मुका वाटतो मी परी मुक नाही
व्यथा सांगणारा गळा दाटला रे !!!
तिला साजणाची कधी याद यावी
तिचा एकटिचा असे मामला रे !!!
कधी सावली का तुझ्या दूर गेली ??
पळुनी असा तू कुठे चालला रे !!!
किती मी तुझी चाकरी रोज केली
प्रभू तू तरिही कुठे पावला रे !!!
जिच्या मी रुपेरी रूपाचा दिवाणा
तिनेही लटांनी गळा कापला रे !!!
जराशी उशिरा मला मौत यावी
तिने कुंकवाचा टिळा लावला रे !!!
कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
उगाचच रातभर जागायला हवे!
सुखासिन जगण्याची झाली जळमटे
जगणेच सारे पुरे झाडायला हवे !! ....कधीतरी वेड्यागत वागायला हवे! .......
गारठ्यात फेकुनिया शाल, कानटोपी
कधीतरी थंडीलाच वाजायला हवे!
छोटे मोठे दिवे फुंकरिने मालवुन
कधीतरी सूर्यावर जळायला हवे! ....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
खोट्या खोट्या शृंगाराची लाली रंगवुन
कशासाठी सजायचे चापून चोपुन?
वाऱ्यावर उडवत पदर जिण्याचा
गाणे गुलछबु कधी म्हणायला हवे! ....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
भांड्यावर भांडे कधि भिडायला हवे
उगाचच सखिवर चिडायला हवे
मुखातुन तिच्यावर पाखडत आग
एकिकडे प्रेमगीत लिहायला हवे! ....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
विळीपरी कधि एक चंद्रकोर घ्यावी
हिरविशी स्वप्ने धारेधारेने चिरावी!
कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता
मनातून पूर्णबिंब तगायला हवे! ....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
मनातल्या माकडाशी हात मिळवुन
आचरावे कधितरी विचारावाचुन!
झाडापास झोंबुनिया हाति येता फळ
सहजपणाने ते ही फेकायला हवे! ....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
कधि राती लावुनिया नयनांचे दिवे
पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे!
शोधुनिया प्राणातले दुमडले पान
मग त्याने आपल्याला चाळायला हवे!! ....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
ढगळसा कोट, छडी, विजार तोकडी
भटक्याची चाल दैवासारखी फेंगडी!
जगण्याला यावी अशी विनोदाची जाण
हसताना पापण्यांनी भिजायला हवे! ....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
स्वतःला विकुन काय घेशिल विकत?
खरी खरी सुखे राजा, मिळती फुकट!
हपापुन बाजारात मागशिल किती?
स्वतःतच नवे काही शोधायला हवे!! ....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
तेच तेच पाणी आणि तीच तीच हवा!
आणि तुला बदलही कशासाठी हवा?
जुनेच अजुन, आहे रियाजावाचून!
गिळलेले आधी सारे पचायला ह वे!! ....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
नको बघु पाठीमागे, येईल कळुन
कितीतरी करायचे गेलेले राहुन!
नको करु त्रागा असा उद्याच्या दारात
स्वतःलाही कधि माफ करायला हवे! ....कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
- संदिप खरे
Monday, February 15, 2010
ek sher
Jee Bhar Ke Roye Toh Kuch Qarar Payaa....
Iss Daur Mein Kisne Saccha Pyaar Paya....
Zindagi Guzar Rahi Hai Imtihano Mein....
Ek Zakhm Bhara Toh Dusraa Tayyar Payaa...
Iss Daur Mein Kisne Saccha Pyaar Paya....
Zindagi Guzar Rahi Hai Imtihano Mein....
Ek Zakhm Bhara Toh Dusraa Tayyar Payaa...
Thursday, February 11, 2010
Subscribe to:
Comments (Atom)